38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

दिव्यांग क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन

Date:

Share post:

( राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिर २० फेब्रुवारी रोजी )

दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग (अस्थिव्यंग) पुरुष क्रिकेट खेळाडूंना सुचित करण्यात येते की ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज, मुंबई, इंडिया यांचे परवानगीने तसेच दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिर दिनांक २० फेब्रुवारी सोमवार रोजी निंबाळकर ग्राउंड, शाहू कॉलेज, पुणे येथे सकाळी ठीक १० वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.

तरी महाराष्ट्रातील सर्व अस्थिव्यंग दिव्यांग खेळाडूंनी या निवड चाचणी शिबिरास उपस्थित राहून क्रीडा कौशल्य सादर करावे. सदर निवड चाचणी शिबिर हे माजी रणजी खेळाडू मिलिंद गुंजाळ, श्रीकांत काटे व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन या त्रिस्तरीय निवड चाचणी सदस्यांच्या मार्फत होणार आहे. सदर निवड चाचणी शिबिरातून मार्च महिन्यात पुणे येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ खेळणार आहे. तरी ९८२२८४१५१६ व ८४५९५९७३०८
या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा सचिव राजू मुजावर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!