38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिकेतील अभिनेत्री मीरा देवस्थळे म्हणाली, “मुली या प्रेम करण्यासाठी असतात, हुंड्याच्या नावाखाली वस्तुकरण करण्यासाठी नव्हे”

Date:

Share post:

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनची नवीन मालिका ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ ही विचार प्रवर्तक मालिका आहे. या मालिकेत नंदिनीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिच्यात परंपरेची मुळे खोलवर रुजलेली असली तरी ती महिलांच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मान्यतांवर आक्षेप घेणारी खंबीर स्त्री आहे. ही अभूतपूर्व मालिका समाजाला त्रस्त करणाऱ्या हुंडा प्रथेवर प्रकाशझोत टाकते. त्यात नंदिनी एक शक्तीशाली मागणी करते – “मुझे मेरा दहेज वापस चाहिए” (मला माझा हुंडा परत हवा आहे). ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिकेच्या केंद्रस्थानी मीरा देवस्थळेकडून साकारली जाणारी नंदिनीची भूमिका आहे. तिची व्यक्तिरेखा महिलांच्या आत्मसन्मानाला अपमानित करणाऱ्या कित्येक शतके जुन्या मान्यतांना आव्हान देणाऱ्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.

गुजरातमध्ये घडणाऱ्या या मालिकेत नंदिनी ही मामा-मामी आणि तिचा भाऊ मीतसोबत राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिच्याकडे स्वत:ची नैतिक मूल्ये आहेत आणि ती आपल्या वडिलधाऱ्यांचा सन्मानही करते. मात्र जेव्हा केव्हा ती चुकीच्या गोष्टी घडताना पाहते तेव्हा त्यावर भूमिका घेण्यावर तिचा विश्वास आहे. आपल्या व्यक्तिरेखेबाबत बोलताना मीरा देवस्थळे म्हणाली की, “मला वाटते की आवर्जून सांगितली जावी, अशी ही कथा आहे. आपल्या समाजात आजही अस्तित्वात असलेल्या कुरीतींबाबत बहुसंख्य लोकांनी प्रश्न विचारणे गरजेचे आहे. असे मजबूत उद्दिष्ट्य असलेली भूमिका साकारण्याबाबत मी खूप उत्सुक झालेले आहे. मला वाटते की लेकी या प्रेम करण्यासाठी असतात, हुंड्याच्या नावाखाली वस्तुकरण करण्यासाठी नव्हे. मालिकेतील माझ्या भूमिकेच्या माध्यमातून मला ही छाप पाडायची खूप इच्छा आहे. आपल्या लग्नाच्या वेळी हुंडा देण्यात आल्याचे नंदिनीला माहितच नव्हते. मात्र ही मालिका तिच्या साहसी प्रवासावर प्रकाशझोत टाकणार आहे. वैवाहिक आयुष्यात सुखी असतानाही ती आपल्या सासू-सासऱ्यांविरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घेते अन् म्हणते, “मुझे मेरा दहेज वापस चाहिए” (मला माझा हुंडा परत हवा आहे).

“दहेज वापसी की पहली पुकार” हा परिणामकारक संदेश मालिका तुम्हाला नव्या प्रोमोतून देते. त्याचा व्हिडिओ येथे पाहा : https://www.instagram.com/reel/C21W13-LWRe/?igsh=ajY1NDRrOHd4aGFt

‘कुछ रीत जगत की ऐसी है’ ही मालिका 19 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. दर सोमवार ते शनिवारी रात्री 8:30 वाजता तिचे प्रसारण होईल, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!