38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

माझ्या दृष्टीने गावचा विकास हाच पक्ष – आमदार भीमराव तापकीर

Date:

Share post:

खेड शिवापूर (वार्ताहार) दि.05 :- घरावर पाटी लावण्यासाठी सरपंच होऊ नका, तर गावचा विकास कसा करता येईल यावर अभ्यास करा. आजपर्यंत शिवगंगा खोऱ्याला भरपूर निधी मंजूर करून दिला आहे. त्याप्रमाणे कामेही झालेली आपण पाहताय. त्यामुळे गावातील हेवे दावे सोडून गावातील विकासाला प्राधान्य द्या. कारण माझ्या दृष्टीने गावचा विकास हाच पक्ष आहे, त्यामुळे मी निधीला कमी पडणार नाही. यावेळी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या स्नेहा दिघे, रोहित खाडे यांचा त्यांच्या मार्गदर्शक योगेश सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.

शिवापूर (ता. हवेली) येथे कोंढाणपूर फाटा ते सिंहगड रस्त्यावरील असलेल्या शिवापूर ते श्रीरामनगर दरम्यानच्या गेली पाच वर्षे रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी तापकीर बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, माजी पं. स. सदस्य अनिरुद्ध यादव, सरपंच अण्णा दिघे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक रजपूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, भाजपा शिवगंगा खोऱ्याच्या अध्यक्षा दीपाली वाव्हळ, चंद्रकांत हवलदार, माजी सरपंच सतीश दिघे, अमोल कोंडे, स्वप्नील जगताप, राकेश गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश दिघे, उपसरपंच राजू सट्टे, राजेंद्र दिघे, सुनील नावडकर, ओमकार हवलदार आदी उपस्थित होते.

तापकीर म्हणाले की, खडकवासला विधानसभा मतदार संघातील नांदेड ते पानशेत, कोंढणपूर ते तोरणा या रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. खर तर या रस्त्याचे काम लवकर होणे गरजेचे होते मात्र काही ठेकेदार हरामखोर असतात. कामे अर्धवट सोडतात, तर कधी निकृष्ट करतात. याकडे आपल्या भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे निवडून येण्यासाठी नियोजन करता, तसेच नियोजन आपल्या गावाच्या विकासासाठी करा असा खोचक सल्लाही दिला. यावेळी पाण्यासाठी मोदी सरकारने ६२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारचे आभार मानून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मतदार संघातर्फे अभिनंदन केले. तसेच खडकवासला विधानसभा मतदार संघात केलेल्या विकास कामांची माहिती देण्यात आली.

जिल्हाप्रमुख रमेश कोंडे म्हणाले की, या दरम्यानच्या रस्ता हा डांबरीकरणाचा करीत असताना दिवंगत माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ लांडगे यांनी बंद पाडून सदर रस्ता काँक्रिटिकरणचा पाहिजे अशी मागणी केली होती. त्या मागणीला आमदार तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली व भागातील सरपंच यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने निधी मंजूर केला, व खऱ्या अर्थाने मागणीला एक प्रकारे यश आले याची आठवण करून दिली.

फोटो – भागातील सरपंच उपसरपंच यांना मार्गदर्शन करताना आमदार तापकीर व इतर मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!