33.2 C
Pune
Friday, May 3, 2024

इंडियन आयडॉल 14 चा स्पर्धक उत्कर्ष वानखेडेला श्रेया घोषाल म्हणाली, “नागपूर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण आता तुझे नाव देखील या शहराशी जोडले गेले आहे”

Date:

Share post:

या शनिवारी, एका संगीतमय संध्येचा आनंद लुटा, कारण सदाबहार संगीतकार जोडी आनंद-मिलिंद सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 14 या लोकप्रिय गायन रियालिटी शोच्या मंचावर उपस्थित असणार आहेत. ‘हिट्स ऑफ आनंद मिलिंद’ भाग साजरा करताना स्पर्धक या संगीतकार जोडीची लोकप्रिय गाणी सादर करतील आणि परीक्षक श्रेया घोषाल तसेच या वीकएंडचे अतिथी परीक्षक शेखर रावजियानी यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतील.

नागपूरहून आलेला स्पर्धक ‘महाराष्ट्र की शान’ उत्कर्ष वानखेडे ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील ‘ए मेरे हमसफर’ आणि ‘संगीत’ चित्रपटातील ‘ओ रब्बा कोई तो बताए’ ही गाणी सादर करून प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे लक्ष वेधून घेईल. या दोन्ही गाण्यांचे संगीतकार आनंद-मिलिंद होते आणि या भागात ते दोघे या गाण्यांशी निगडीत आठवणी सांगतील.

उत्कर्षचे कौतुक करताना शेखर रावजियानी म्हणाला, “तुझा आवाज खूप सुंदर आणि सुमधुर आहे, जो रेकॉर्डिंगसाठी फारच अनुकूल आहे”.

श्रेयाने उत्कर्षला या शब्दांत दाद दिली, “मी नुकतीच नागपूरहून आले आणि खरंच सांगते, मी तिकडे एकच आवाज ऐकला, आणि तो आवाज म्हणजे उत्कर्षचा! तुझ्या शहरातील प्रत्येकाला तुझा खूप अभिमान वाटतो. मला या गोष्टीचा आनंद वाटतो की, समग्र देशातून तुझे कौतुक होत आहे, विशेषतः तुझ्या शहरातून. नागपूर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण आता तुझे नाव देखील या शहाराशी जोडले गेले आहे.”

हिट्स ऑफ आनंद-मिलिंद’चा आनंद लुटायला विसरू नका, या शनिवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 14 मध्ये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!