33.2 C
Pune
Friday, May 3, 2024

संस्कार प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहिली मराठ्यांची यशोगाथा

Date:

Share post:


पिरंगुट : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट या गावांमधील संस्कार प्रायमरी स्कूल येथील विद्यार्थ्यांनी काल मंगळवारी दि.१७ ऑक्टोबर २०२३ रोजी पानिपतच्या युध्दात कैद झालेल्या मराठ्यांची यशोगाथा मांडणारा बलोच हा चित्रपट पाहिला.हा चित्रपट पाहताना अक्षरशः अंगावर शहारे येत असल्याचा अनुभव येथील संचालिका सौ.स्नेहा साठे मॅडम,संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजी साठे सर व शिक्षक वर्गाने सांगीतला.तसेचं यावेळी विद्यार्थी सुध्दा चित्रपट पाहताना छत्रपती शिवाजी महाराज की जय व जय शिवाजी जय भवानी अश्या घोषणा देताना दिसले.अर्थात मुलांनाही हा अपरिचित इतिहास फार आवडला असल्याचे येथील विद्यार्थी कु.वरद संतोष सातपुते,कु.आर्यन विजय थरकुडे आणि काही विद्यार्थ्यांनी सांगीतल.हा चित्रपट एक अपरिचित इतिहास आपल्या डोळ्यासमोर आणत असून सर्व विद्यार्थ्यांनी हा चित्रपट नक्की पहावा असे आवाहन संस्कार शाळेच्या संचालिका सौ.स्नेहा साठे मॅडम व संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजी साठे सर यांनी केलं आहे.तसेचं,हा चित्रपट महाराष्ट्रभर सर्व शाळांमध्ये दाखवला जाणार असून यासाठी विद्यार्थी किंवा शाळा यांना अल्पदरात हा चित्रपट पाहता येणार आहे.तत्पुर्वी महाराष्ट्रात सर्वात आधी पहिल्यांदा चित्रपट पाहण्याचा मान पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुटमधील संस्कार प्रायमरी स्कूल या शाळेला मिळाला आहे.यावेळी बलोच चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते श्री.गणेश शिंदे तसेचं बलोच चित्रपटाचे निर्माती सौ.किर्ती वराडकर,श्री.चारुदत्त वराडकर,यांसोबत कार्यकारी निर्माते संतोष खरात,निर्मीती व्यवस्थापक स्वानंद देव,सहाय्यक निर्मीती व्यवस्थापक रोहित ओव्हाळ,सहाय्यक व्यवस्थापक डॉ.विनील‌ धोत्रे,नयूम पठाण,नितीन शेटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेचं शाळेतील सर्व नियोजन शाळेच्या शिक्षकवृंद श्री.प्रशांत देशमुख,सुमिना राणा,अश्विनी नलावडे,पल्लवी गोळे,पल्लवी उंडेगांवकर,दिपाली आंबेकर,दिपाली भावसार,सुनिता कोले,सुरेखा शेळके यांनी केले होते.यावेळी बोलताना निर्माते गणेश शिंदे आणि किर्ती वराडकर यांनी सांगितले की,लवकरचं बलोच हा चित्रपट महाराष्ट्रभर विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दाखवणार असून हा चित्रपट पाहण्यासाठी आपण ९५११२८७८६० या व्हाॅटस अप नंबरवर आपल्या शाळेचे नाव,संपुर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक पाठवावा,जेणेकरून आम्हांला लवकरात लवकर येऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहता येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!