33.2 C
Pune
Friday, May 3, 2024

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात

Date:

Share post:

बावधन परिसरात स्वच्छता करत महात्मा गांधीना अभिवादन

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे बाप्पाला साकडे; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’ उपक्रम

पुणे : “स्वच्छता हा मानवतेची सेवा करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या मनाची, घराची, परिसराची, शहराची स्वच्छता ठेवणे गरजेचे असून, विघ्नहर्ता गणरायाने सर्वाना अस्वच्छता व दुर्गंधीपासून दूर ठेवत हरित पर्यावरण जपण्यासाठी आशीर्वाद द्यावेत,” असे साकडे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी गणपती बाप्पांकडे घातले. स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या महात्मा गांधी यांनाही या स्वच्छता अभियानातून अभिवादन करतो, असे त्यांनी नमूद केले.

गणेशोत्सव, महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत अभियानाचे औचित्य साधून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने स्वच्छता सप्ताहाचे आयोजन केले होते. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ उपक्रमात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटस ऑफ हेल्थ सायन्सेस अंतर्गत कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि फार्मसी कॉलेज, सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, तसेच सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला.

स्वच्छता, आरोग्याच्या समस्या आणि १७ शाश्वत उद्दिष्टांच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, बावधन भागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘स्वच्छता हाच मानवसेवेचा मार्ग’, ‘हरित भारत, श्रेष्ठ भारत’, ‘स्वच्छ पुणे स्वच्छ बावधन’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. स्वच्छ भारत अभियान-शहरी २.० अंतर्गत कचरा मुक्त शहरांच्या निर्मितीसाठी युवकांच्या नेतृत्वातील ‘इंडियन स्वच्छता लीग’ ही भारतातील पहिली आंतरशहरी स्पर्धा आहे. २०२२ मध्ये झालेल्या या लीगमध्ये पाच लाखांहून अधिक विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी नागरिक, तरुण नेते, सेलिब्रेटी सहभागी झाले होते.

याप्रसंगी बावधनचे नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेवक किरण दगडेपाटील, उपअभियंता केदार ओझे, अमर मदिकुंट, डीएसआय राम सोनवणे, एसआय हेमंत चाकणकर, सचिन लोकरे, मुकादम राम गायकवाड यांच्यासह सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या अकॅडमिक डीन प्रतीक्षा वाबळे, संचालक प्रशांत पितालिया, हॉटेल मॅनेजमेंटचे समन्वयक अतुल देशपांडे, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य रामनाथ, हेमंत शहा, भास्कर वर्दी, धनंजय अवसरीकर, खुशाली ओझा, सुनील धनगर, राज कांकरिया, शीतल भुसारी, डॉ. कांचन गोडे आदी उपस्थित होते. सूर्यदत्त संस्थेसह सोनक टोयोटा शोरुम, बावधन सिटीझन फोरम, प्रकृती वेस्ट मॅनेजमेंट, चेतन दत्ताजी गायकवाड शाळा, जनसुविधा फाउंडेशन, स्वच्छ संस्था, आदर पुनावाला संस्था, कॅलसॉफ्ट कंपनीचे पदाधिकारी बावधनमधील नागरिकांनी एक तास श्रमदान केले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सहभागातून सूर्यदत्त परिसर व भवतालच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. ॲक्सिस बँक पाषाण रोड ते सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटपर्यंत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी रस्ते सफाई तसेच प्लास्टिक व काचेच्या वस्तूंचा कचरा विलगीकरन करून तसेच हा कचरा पिशव्यांमध्ये भरून महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये भरला. विद्यार्थी आणि शिक्षक यांना महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी यांचे सहकार्य लाभले. महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना हॅन्ड ग्लोज, मास्क तसेच स्वच्छतेचे सफाईचे साहित्य देण्यात आले.

जवळपास एक हजार विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. सामाजिक समस्यांवर कल्पक आणि नाविन्यपूर्ण संदेश फलक जनजागृतीसाठी उपयुक्त ठरतात. स्वच्छतेविषयीचे असेच संदेश फलक हातात घेऊन ‘सूर्यदत्त’ लिहिलेले मास्क, हॅन्ड ग्लोव्हज आणि खादी टोपी डोक्यावर घालून विद्यार्थ्यांनी पदयात्रा काढली. जवळपास तीन तास चाललेल्या या पदयात्रेत बावधनसह आसपासच्या परिसरातील लाखो पुणेकरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्यासह पुणे महानगर पालिकेतील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, या ऍक्सिस बँकेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पदयात्रेचे उद्घाटन झाले. बावधन सिनिअर सिटीजन फोरमचे पदाधिकारी व स्वयंसेवक हे देखील या पदयात्रेत सहभागी झाले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्वच्छ व हरित भारताचे महत्व अधिक आहे. आपल्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या चांगल्या सवयीपासून सुरु होतात. देशाच्या प्रगतीसाठी सातत्याने त्यामध्ये चांगले बदल करत राहणे गरजेचे आहे. आपण स्थानिक पातळीवर काम करताना जागतिक स्तरावरचा विचार करणेही क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांच्या हाती झाडू आणि कचरा संकलनासाठी डस्टबिन होत्या. ऍक्सिस बँक ते चेलाराम हॉस्पिटलपर्यंत सर्वानी रस्ता, दुकानांचा परिसर स्वच्छ केला. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी दुकानांना भेटी देऊन तेथील लोकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे, तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करून बदल्यांमध्ये टाकण्याचे आवाहन केले. प्लास्टिक बाटल्या, फुटक्या काचा, प्लास्टिक, रॅपर्स यासह अन्य वापरात नसलेल्या वस्तूंचे संकल्पना करून त्याची योग्य विल्हेवाट संस्थेमार्फत लावण्यात आली. सलग तीन तासांच्या मेहनतीनंतर विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छ व सुंदर बावधनची छायाचित्रे घेतली. भारत माता की जय या जयघोषाने स्वच्छता मोहिमेची सांगता झाली. आजच्या स्वच्छता मोहिमेमुळे सर्व सहभागी आणि निरीक्षकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होणार आहे.”

“सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्हचा एक भाग म्हणून, संस्था कोणत्याही एका विशिष्ट थीमवर आपले विद्यार्थी, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि सहयोगी यांच्यामार्फत वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते. सूर्यदत्त संस्था केजी ते पीएचडी पर्यंत शिक्षण देताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत ‘पाणी वाचवा-विजेची बचत करा’, ‘सेव्ह द प्लॅनेट’, ‘स्त्री भ्रूणहत्या थांबवा’, ‘कर्करोग व एड्स जनजागृती’, ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ अशा उपक्रमांसह रिक्षा चालक व रेल्वे स्टेशनवरील कुलींसाठी इंग्रजी संभाषण वर्ग, कॉर्पोरेट नोकरदारांसाठी फॅशन डिझायनिंग, मसाला बनवणे, बेकिंग आदींचे प्रशिक्षण, गृहिणी व गरजू महिलांसाठी मिठाई प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. या जगाला राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवू पाहणारे आणि माणुसकी जपत संवेदनशील नेतृत्व घडायला हवेत, या तत्वज्ञानावर आधारित सूर्यदत्त संस्था कार्यरत आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!