33.2 C
Pune
Friday, May 3, 2024

सोनी सबचे कलाकार काय म्हणत आहेत दिवाळीविषयी..

Date:

Share post:

सोनी सबचे कलाकार काय म्हणत आहेत दिवाळीविषयी..

मुंबई : दिवाळी हा सण म्हणजे काळोखावरील प्रकाशाच्या, वाईटावरील चांगल्याच्या आणि अज्ञानावरील ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी समस्त देशातील लोक आपले घर दिवे आणि पणत्यांनी सुशोभित करतात. घरापुढे सुंदर रांगोळी रेखतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात. सोनी सबवरील लोकप्रिय कलाकार सांगत आहेत ते दिवाळी कशी साजरी करतात, त्यांचा सेटवरचा अनुभव कसा आहे आणि इतरही बरेच काही.
सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनची भूमिका करत असलेली अंजली तत्रारी म्हणते, “वर्षभर मी दिवाळीची वाट बघत असते, कारण माझी ही फारच आवडती परंपरा आहे. दिवाळीशी निगडीत जुन्या परंपरा मी मनापासून पाळते. घराची साफसफाई करण्यापासून ते चविष्ट फराळावर ताव मारण्यापर्यंत सगळेच मी मनापासून करते. दिव्यांच्या माळांनी मी घराची रोषणाई करते. या दिवाळीत मी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहे, ती गोष्ट म्हणजे रांगोळी काढणे आणि माझ्या मित्र-मैत्रिणी आणि वंशजच्या सह-कलाकारांसोबत कार्ड पार्टीची!”

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका साकारणारी करुणा पांडे म्हणते, “मला पहिल्यापासूनच दिवाळी हा सण फार आवडतो. दिव्यांविषयी मला विशेष आकर्षण आहे. लहानपणी हा सण खाण्यापिण्याची चंगळ म्हणून आवडायचा. माझी आई दिवाळीसाठी फराळ करायची त्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. आज देखील मिठाईसमोर माझी संपूर्ण शरणागती असते. दिवाळीच्या गोड आठवणींचा स्वाद त्यात असतो. पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका करताना लहानपणी माझ्या संपूर्ण कुटुंबासह साजरी केलेली दिवाळी मला आठवते. त्या आठवणी मला आयुष्यात चांगली कामगिरी करण्याचे बळ देतात.”

सोनी सबवरील वंशज मालिकेत भानुप्रताप महाजन ही व्यक्तिरेखा साकारणारा पुनीत इस्सार म्हणतो, “दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, ज्याची मी आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळी आपले घर आणि जीवन प्रकाशमय करते. लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी अजून मला खुणावतात. आपल्या देशात दिवाळी हा फार मोठा आनंद पसरवणारा सण आहे. वंशज मालिकेत माझी भूमिका एका मोठ्या व्यवसाय साम्राज्याच्या राखणकर्त्याची आणि या सम्राज्यासाठी पात्र वारस शोधणाऱ्याची आहे. त्याचप्रमाणे दिवाळी हा सण देखील माझ्यात आशा, प्रकाश आणि जबाबदारीची जाणीव जागवतो.”

सोनी सबवरील ‘पश्मीना’ मालिकेत प्रीतीची भूमिका करणारी गौरी प्रधान म्हणते, “मी जम्मूची आहे, पण मला काश्मीरमध्ये दिवाळी साजरी करण्याची संधी कधीच मिळाली नाही, विशेषतः माझा पती हितेन याच्यासोबत. यावर्षीची दिवाळी लक्षणीय आहे, कारण यावर्षी ‘पश्मीना – धागे मोहब्बत के’ या माझ्या नवीन मालिकेच्या टीमसोबत हा सण साजरा करण्याची संधी मला मिळाली आहे. हितेन आणि मी असे ठरवले आहे की आमच्या मुलांना देखील इथेच बोलावून घ्यायचे. अशा रीतीने मी माझे कुटुंब आणि पश्मीनाची संपूर्ण टीम यांच्यासह दिवाळी साजरी करू शकेन.”

सोनी सबवरील पश्मीना मालिकेत राघवची भूमिका करणारा निशांत मलकानी म्हणतो, “काश्मीरच्या धुंद-मनोहर परिसरात दिवाळीचा सण साजरा करणे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या जन्म दुबईचा आहे. दिवाळीच्या माझ्या आठवणी कोलकाता येथे काली पूजेच्या परंपरेशी जोडलेल्या आहेत. पण यावर्षी नियतीच्या मनात काही वेगळेच होते, म्हणूनच तर यावर्षी मी इथे, काश्मीरमध्ये आहे. या शूटिंगच्या निमित्ताने याच ठिकाणी आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत, परंपरा आणि संस्कृतीचा संयोग बघणार आहोत आणि पश्मीनाच्या टीमसोबत मजा करणार आहोत. सगळा पारंपरिक सोहळा चालू आहे आणि मी त्याचा मनमुराद आनंद उपभोगत आहे.”

सोनी सबवरील वंशज मालिकेत दिग्विजयची भूमिका करणारा माहिर पांधी म्हणतो, “ज्याप्रमाणे दिवाळी अंधार आणि प्रकाश यांच्यातील नाते दाखवते, आपल्या स्वभावात विविध विरोधाभासी वृत्तींचा गोफ विणलेला असतो. मी फिटनेस सांभाळणारा आहे, पण दिवाळी ही अशी वेळ असते, जेव्हा मी स्वतःला मुक्त सोडतो आणि फराळाचा यथेच्छ आस्वाद घेतो. मी दिवाळीची आणि स्वादिष्ट फराळाची आतुरतेने वाट बघत आहे.”
बघत रहा, ‘वंशज’, ‘पुष्पा इम्पॉसिबल’ आणि ‘पश्मीना – धागे मोहब्बत के’ फक्त सोनी सबवर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!