38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे, दिव्य भारतीय महाकाव्य – ‘श्रीमद् रामायण’

Date:

Share post:

  • प्रोमोमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या भूमिकेत दिसला अभिनेता सुजय रेऊ कोट्यावधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सदगुणांचा पुतळा आहे. अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’. ही मालिका 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका प्रत्येक भारतीय कुटुंबाला एका प्राचीन काळात घेऊन जाईल, ज्या काळात प्रभावी स्वरूपात अस्तित्त्वात असलेली जीवनमूल्ये आणि शिकवण आजच्या काळात देखील सुसंबद्ध आहे. या वाहिनीने सदर मालिकेचा एक नवीन प्रोमो दाखल केला आहे, ज्यामध्ये हे उघड झाले आहे की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता आहे, सुजय रेऊ.

आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका साकारत असलेला सुजय रेऊ या भूमिकेबद्दल म्हणतो, ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत ही भूमिका मिळणे हा मी माझा गौरव मानतो. कोट्यावधी लोकांचे आराध्य दैवत असलेली ही देवता म्हणजे केवळ एक भूमिका नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि एका आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामाची कथा अनेक भारतीयांप्रमाणे माझ्यासाठीही जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीराम कथा पडद्यावर जिवंत करणे हे माझ्यासाठी स्वप्न साकार होत असल्यासारखे आहे.”

‘श्रीमद् रामायण’ सुरू होत आहे, 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

प्रोमो येथे बघा:
Instagram:
https://www.instagram.com/reel/C0ZHh1GvhxS/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Facebook:
https://fb.watch/oIfkztStEV/?mibextid=Nif5oz

Twitter/X:
https://twitter.com/SonyTV/status/1731305215427772460?t=25b4nNYnvgIUiELHjOxk8g&s=19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!