38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

इंडियन आयडॉल 14 मध्ये रणबीर कपूर शुभदीप दास या स्पर्धकाची प्रशंसा करताना म्हणाला, “तुझ्या पार्श्वगायनावर अभिनय करण्याची संधी कधी मिळते, असे झाले आहे मला.”

Date:

Share post:

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय संगीत रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल 14’ मध्ये ‘शानदार परिवार स्पेशल’ एपिसोड साजरा केला जाणार आहे त्यामुळे आणखी एका धमाकेदार वीकएंड साठी सज्ज व्हा. या भागात ‘अॅनिमल’ चित्रपटाचे कलाकार- रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना उपस्थित असतील आणि ते केवळ स्पर्धकांनी सादर केलेल्या गाण्यांचा आनंद घेणार नाहीत तर प्रेक्षकांना रिझवणारे काही मनोरंजक किस्से देखील सांगणार आहेत.

परिवार स्पेशल एपिसोडचा एक भाग म्हणून, रणबीर कपूर कोलकाताच्या शुभदीप दास या स्पर्धकाच्या आईला त्याचा परफॉर्मन्स प्रत्यक्ष बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करून शुभदीपला आश्चर्यचकित करताना दिसेल. शुभदीप रणबीर कपूरच्या ‘सावरिया’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या सुपरहिट चित्रपटांमधील ‘जब से तेरे नैना’ आणि ‘केसरीया’ या गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण करताना दिसेल.

त्याच्या गायकीने थक्क होऊन रणबीर कपूर म्हणाला, “तू म्हटलेले ‘जब से तेरे नैना’ हे माझे पहिले गाणे होते जे शानने गायले होते आणि ‘केसरिया’ हे अरिजित सिंहने गायले होते; दोघेही महान गायक आहेत. तू तीच गाणी गायलास पण त्याला तुझ्या स्वतःच्या खास स्टाइलची जोड दिलीस. मी इतकेच म्हणेन की, तुझ्या पार्श्वगायनावर अभिनय करण्याची संधी कधी मिळते असे मला झाले आहे.”

श्रेया घोषालने देखील शुभदीप दासची स्तुती करत सांगितले, “मी नेहमी तुझ्या परफॉर्मन्सची आतुरतेने वाट बघत असते. मला खात्री आहे की एक वेळ अशी येईल जेव्हा तुझा शो बघण्यासाठी आम्हाला तिकीट विकत घ्यावे लागेल.”

अवश्य बघा, ‘इंडियन आयडॉल 14’ येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!