33 C
Pune
Friday, May 3, 2024

‘दबंगी मुलगी आई रे आई’ मालिकेतील अभिनेता मानव गोहिल म्हणाला, “माझी व्यक्तिरेखा अंकुश ही खूप मजबूत व्यक्ती आहे, पण त्याच्याही काही कमकुवत बाबी आहेत”

Date:

Share post:

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘दबंगी मुलगी आई रे आई’ मालिकेने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्य,पण तितक्याच तीव्र नाट्यमयतेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. आर्या (माही भद्रा) या दबंगी चालढाल असलेल्या तरुणीभोवती या मालिकेचे कथानक फिरते. आपल्या वडिलांना शोधून काढत त्यांच्याशी एकजूट होण्याच्या प्रवासाला ती निघालेली असते. आपले वडील हे सुपरकॉप असल्याचे आर्याचा वाटत असते. प्रत्यक्षात आपण सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या सत्या (आमीर दळवी) या निरंकुश गँगस्टरची कन्या आहेत, या तथ्यापासून ती पूर्णपणे अनभिज्ञ असते.
वेगवान घडमोडींच्या क्रमात, आपला मुलगा मरण पावल्याचे समजून सूड उगवण्याची धगधगती आग मनात ठेवत सत्या हा गणपती विसर्जनादरम्यान आर्याची आई छायाची (सई देवधर) हत्या करतो. या कृत्यामुळे सत्याचा भाऊ अंकुश (मानव गोहिल) हा आपल्या वहिनीचे संरक्षण करू न शकल्याच्या पश्चातापाने कोलमडून पडतो. अंकुशला आर्याबद्दलचे वास्तव माहीत असते. सत्या आणि त्याच्या काळ्या ताकदींच्या तावडीतून आर्याला वाचवण्याची शपथ अंकुश घेतो. आर्याला शोधून काढल्यानंतर पश्चातापदग्ध अंकुश आर्याला तिच्या आईच्या मृत्यूबद्दल कळवण्याची हिंमत दाखवतो. यामुळे आर्या कोलमडून पडते अन् ती अंकुशच्या हेतूवरच संशय घेऊ लागते.
मती गुंग करून टाकणाऱ्या या कथानकाबाबत अभिनेता मानव गोहिल म्हणाला की, “माझी व्यक्तिरेखा अंकुश ही खूप मजबूत व्यक्ती आहे. मात्र अंकुशच्याही काही कमकुवत बाबी आहेत. त्याला जेव्हा छायाच्या मृत्यूबद्दल कळते तेव्हा तो स्वत:ला असहाय्य आणि दोषी समजू लागतो. कारण तोच एकमेव व्यक्ती म्हणून तिचे संरक्षण करू शकला असता. मात्र भूतकाळातील घटनांमुळे तो तिच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि आता… एकमेव त्यालाच आर्याच्या वास्तवाची माहिती आहे. आपला भाऊ सत्यापासून तिला वाचवण्यासाठी तो सर्वकाही गाेष्टी करतो. यामुळे त्याच्या मनात आर्याबद्दल धाकधुकीची भावना जोर धरू लागते. अकुंशवर जेव्हा आर्याला छायाबद्दलचे सत्य सांगण्याची वेळ येतो, तो सीन माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक आणि तितकाच हृदयद्रावकही होता. कारण त्या एका क्षणात प्रचंड भावभावनांचा पाट वाहत असतो.”
चिमुकली कलाकार माही भद्रासोबतच्या आपल्या मैत्रीबद्दल मानव म्हणाला की, “आमची छकुली रॉकस्टार माही ही खूप झकास मुलगी अन् तितकीच उत्तम अभिनेत्री आहे. ती खरोखरच आमची दबंगी आहे. चित्रीकरणाची प्रक्रिया तिला खरोखरच खूप आवडते, प्रत्येक दृश्य ती अचूकपणे साकारते. ती जो निरागसपणा आणि भावना चेहऱ्यावर आणते, यामुळे तिची व्यक्तिरेखा खूप जिवंत भासते. तिच्यासोबत शूटिंग करणे म्हणजे खूप मज्जा असते. प्रांजळपणे सांगायचे तर मलाही मुलांसोबत काम करणे खूप छान वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही असते. मीही एक मुलीचा बाबा आहे, यामुळे आजूबाजूला मुलं असली की मला खूप निवांत वाटते.”
अंकुश आणि आर्या हे दोघेही वास्तवाचा स्वीकार करतील का? आर्या अंकुशचे ऐकून त्याच्याशी सहकार्य करेल… की आपल्या वडिलांना शोधण्यासाठी ती पळून जाईल? पुढील भाग पाहणे प्रेक्षकांसाठी मोठे औत्सुक्याचे ठरेल.
नक्की पाहा – दबंगी मुलगी आई रे आई, दर सोमवार ते शुकवार रात्री 8:30 वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!