33.2 C
Pune
Friday, May 3, 2024

अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’ या एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन

Date:

Share post:

पुणे : अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’ या एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन आज आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, राजकुमार गबाले (तहसीलदार), अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शनच्या संचालिका दीपाली कांबळे, आप्पासाहेब गवारी, अमोल उगले, दत्तात्रय साळुंखे, मंदाकीनी कांबळे, रंगनाथ कांबळे, आशिष कांबळे, आदी उपस्थित होते.

यापूर्वी ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’या एनजीओच्या मार्फत अनाथ आश्रमाला मदत, गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य, गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणे अशा स्वरूपाची मदत करण्यात आली आहे. तसेच कोरोना काळात जुन्नर मधील आळेफाटा येथे असलेल्या वस्तीतील प्रत्येक कुटूंबाला राशन पोचवले गेले आहे. तर ‘अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन’ अंतर्गत वेबसिरिज,अँड मेकिंग, आल्बम शूट आदी केले जात आहेत. अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शनची पहिली शाखा मुंबई मध्ये सुरू करण्यात आली असून त्यानंतर दुबई अन् आता सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शनची नवीन शाखा सुरू होत आहे.

नवीन शाखेच्या उद्घाटनावेळी अलविरा प्रॉडक्शनच्या ALLVEERAA.INN या मॅगजिनचे प्रकाशन करण्यात आले. त्याच बरोबर चॅरिटी वॉकमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्स ला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर अलविरा प्रॉडक्शनच्या वतीने दिग्गज कलाकारांचे छायाचित्र असलेल्या २०२४ चे कॅलेंडेर तयार करण्यात आले आहे. याचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार नीलेश लंके म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी दीपाली कांबळे आज प्रॉडक्शन हाऊस सुरू केले ही अभिमानाची बाब आहे. दीपाली यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेत आपली वाटचाल केली आहे, कोविड काळात त्यांनी अनेक रुग्णांना जिवादान दिले, अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला, सर्वसामान्य कुटुंबातील मुला – मुलींनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!