38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

श्रीमद रामायण मालिकेत प्रभू श्रीरामांच्या प्रवासाचा पुढचा अध्याय त्यांच्या वनवासापासून सुरू

Date:

Share post:

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर श्रीमद रामायण मालिकेची महागाथा प्रभू श्रीरामांचे जीवन आणि त्यांच्या शिकवणींचे वर्णन करते. या माध्यमातून ही कालातीत कथा प्रेक्षकांचे हृदय आणि मनांत परत रूजवली जात आहे. मालिकेतील सध्याच्या कथेत प्रेक्षकांनी पाहिले आहे की, राणी कैकेयी या मंथराने भडकावलेल्या सुप्त असुरक्षितपणाला बळी पडतात. अनेक वर्षांपूर्वी आपल्याला दिलेल्या दोन वरदानांची पूर्तता करावी, अशी मागणी त्या राजा दशरथ यांच्याकडे करतात. त्यातील पहिली मागणी म्हणजे, राजा म्हणून आपला मुलगा भरत यांचा राज्याभिषेक करण्यात यावा. दुसरी मागणी – प्रभू श्रीराम यांना 14 वर्षांच्या वनवासात पाठवले जावे. मोडून पडलेले राजा दशरथ हे आपल्या सर्वात थोरल्या पुत्राला वनवासात पाठवण्याच्या विचारानेच हतप्रभ होऊन बसतात. मात्र प्रभू श्रीराम राजा दशरथ यांनी राणी कैकेयी यांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याचा निर्णय घेतात. ते राजमुकुटाचा त्याग करून आपली नवपरिणीत पत्नी सीतामाता आणि त्यांच्यापासून दूर जाण्यास नकार देणारा एकनिष्ठ बंधू लक्ष्मण यांच्यासोबत वनवासात जाण्यास तयार होतात.

मालिकेचा प्रोमो येथे पहा : https://www.instagram.com/reel/C23_gwNq1Jk/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

मालिकेतील सध्याच्या कथासूत्राबाबत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते सुजय रेयू म्हणाले की, “एक अभिनेता म्हणून राजवस्त्रांचा त्यात करून वनवासाच्या विनम्र पोशाखातील परिवर्तन ही अनन्यसाधारण बदल होता. मात्र, एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत प्रभू श्रीरामांच्या कृपा आणि लवचिकपणाच्या गुणांचा अंगिकार करणे. हाच या महागाथेचा केंद्रबिंदू आहे. ही मालिका माझ्यासाठी खूपच लाभदायक अनुभव राहिलेली आहे. ती मला माझ्या कलेचा विकास करण्याची मदत तर मिळाली, सोबतच या दिव्य व्यक्तिमत्त्वाच्या चित्रीकरणादरम्यान मिळालेला धडा मला माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यातही मदतशीर ठरत आहे.”

मालिकेत सीतामातेची भूमिका निभावणारी अभिनेत्री प्राची बंसल म्हणाली की, “सीता या अखंड भक्तीचे प्रतीक आहेत. खरे प्रेम हे आव्हानांच्याही पलीकडले असे, हे त्या सिद्ध करतात. राम आणि सीता यांच्यातील भावबंध हा प्रत्येकासाठीच आयुष्यात आलेल्या संकटांना तोंड देताना आपल्या जीवनसाथीसोबत ठामपणे उभे राहण्याची सच्ची प्रेरणा देतो.”

श्रीमद रामायण मालिका पाहत राहा – दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:00 वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!