38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

जग आपल्याला कोणत्या नजरेने पाहते यांचा विचार न करता आपल्या क्षमता जगाला दाखवा; माइंडसेट कोच पंकज भडागे यांचा तृतीयपंथियांना सल्ला

Date:

Share post:

– मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मनाची स्वच्छता मोहीम

पुणे : तृतीयपंथीयांनी सर्वात प्रथम स्वतःला स्वीकारले पाहिजे. जग आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतयं, याच्या वरून तृतीयपंथीयांनी आपली पात्रता ठरवू नये; स्वतःला निराशेच्या, नशेच्या आहारी जाऊ न देता  तृतीयपंथीयांनी आपल्या कृतीतून, जीवनशैलीतून आपली क्षमता, पात्रता इतरांना दाखवून द्यावी, असा सल्ला एमपॉवर माईंडसेट ट्रान्सफॉरमेशन अकॅडमीचे अध्यक्ष आणि  सुप्रसिद्ध माइंडसेट कोच पंकज भडागे यांनी तृतीयपंथीयांना दिला.

मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मनाची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ‘हिजडा समाजाच्या आत्मबल, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता’ या विषयावर पंकज भडागे  बोलत होते. यावेळी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष  रमोला देवासी, प्रेरणा वाघेला, कादंबरी शेख,काजल कुवर, प्रेरणा कुवर, लाची पुणेकर, आशिका पुणेकर, मोनिका पुणेकर, शनाया खुडे,  एमपॅावर अकॅडमीचे शुभम कैरमकोंडा , मनाली झुंजाराराव आदी उपस्थित होते. या व्याख्यानाला समाजातील विविध स्तरात कार्यरत असणाऱ्या तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकज भडागे म्हणाले, तृतीयपंथीयांना पुढील आव्हाने ही इतर नागरिकांपेक्षा वेगळी आहेत. तृतीयपंथीयांनी प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. त्यांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. जग आपल्या बद्दल काय विचार करतयं, आपल्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहिले जाते; यावर विचार करून तृतीयपंथीयांच्या जीवनात कोणताही फरक पडणार नाही. स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तृतीयपंथीयांनी स्वतःला व त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांना स्वीकारणे गरजेचे आहे. अन् समाजापुढे एक चांगले उदाहरण घालून दिले पाहिजे.

तृतीयपंथीयांन मधूनच घडणार मोटीवेशनल स्पीकर 

प्रसिद्ध लाइफ कोच पंकज भडागे यांनी यावेळी तृतीयपंथीयांन मधूनच मोटीवेशनल स्पीकर तयार व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. त्याला मंगलमुखी कीन्नर चॅरिटेबल ट्रस्ट व उपस्थित तृतीयपंथीयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येणाऱ्या काळात तृतीयपंथीयांची एक वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार असून त्यातून पुढे येणाऱ्या काही स्पर्धकांना पंकज भडागे यांच्या मार्फत ट्रेनिंग दिले जाणार आहे. जेणे करून तृतीयपंथीयांना आणखी एक करियरची संधी उपलब्ध होईल तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्यातील व्यक्ती पुढे येतील जेणेकरून त्यांच्या समस्या लवकर सुटतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!