38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

Date:

Share post:


नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.जी.पी.त्रिपाठी,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.उल्हास तावडे तसेचं प्रदेश महासचिव श्री.अभिजीत आपटे यांच्या संगनमताने करण्यात आली.स्वानंद‌ देव यांनी यापुर्वी चित्रपट आणि नाट्य संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी तसेचं राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस पदी काम केले असून त्यांनी अनेक मराठी,हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांसाठी निर्मीती व्यवस्थेसाठी काम केले आहे.तसेचं पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले नाट्यगृहात त्यांनी पार्कींगच्या कारणास्तव आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला होता.त्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या महापुराच्या नुकसानीवेळी तेथील नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरविले होते.तसेचं त्यानंतर झालेल्या कोरोनाच्या महामारीत त्यांनी अनेक कलाकारांना मदत केली होती.कोरोना काळानंतर सर्व नाट्यगृहे बंद असताना बालगंधर्व रंगमंदिर,महात्मा फुले नाट्यगृह पुणे तसेचं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बार्शी जि.सोलापुर येथे जस्ट गंम्मत नावाचे नाटकाचे प्रयोग करणारे ते पहिले निर्माते आहेत.त्यांनी अनेक कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी अनेकप्रकारे मदतीसाठी प्रयत्न केले असल्यामुळे त्यांच्या याचं कामाची दखल घेऊन त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याची चर्चा सर्व नाट्य व सिनेसृष्टीमध्ये होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!