38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

पुण्यातील सर्वात मोठ्या एल्विस वेलनेस स्पा अँड सलूनचे दिमाखदार उदघाटन

Date:

Share post:



पुणे, प्रतिनिधी: आजच्या व्यस्त जीवनामुळे व वाढत्या स्पर्धेमुळे ताणतणाव वाढत जात आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित या थकवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी लोक नवीन उपाय शोधत आहेत. मसाज हा असाच एक उपाय आहे, जो व्यक्तीला आराम देतो आणि पुन्हा उर्जेने भरतो. त्यासाठी अनेकजण केरळ, गोवा किंवा इंडोनेशियातील बाली मध्ये जातात. कारण त्या ठिकाणी अत्यंत आल्हाददायक, शांत आणि स्वच्छ व सुंदर वातावरण, प्रेमळ स्वागतशील स्टाफमुळे स्पा आणि सलूनमध्ये सुखावह वाटते. प्रकाशयोजना आणि आकर्षक वस्तूसंग्रहामुळे दिवसा आणि रात्रीही या स्पा सेंटरचे रूप विलोभनीय वाटते. पुणेकरांना आता याचा मनसोक्त आनंद पुण्यातच घेता येणार आहे. पुण्यातील सर्वात मोठ्या एल्विस वेलनेस स्पा अँड सलूनचे उदघाटन अभिनेता श्रेयश तळपदे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि उर्मिला कोठारे यांच्या शुभहस्ते पार पडले. कल्याणीनगर येथे तब्बल ५००० स्क्वेअर फूट प्रशस्त जागेत हे वेलनेस स्पा आणि सलून उभारण्यात आले आहे.

यावेळी एल्विस वेलनेस स्पा अँड सलूनच्या संचालिका प्रियांका म्हाला म्हणाल्या की, पुण्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या रूपात हे सेंटर सुरु करण्यात आले असून यामध्ये फॅमिली मसाजसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधेसह कुशल स्टाफ, हॉट बाथ टब, कपल मसाज, आरोग्यदायी पेयदेखील येथे देण्यात येणार आहेत. अरोमाथेरपी मसाज, रिफ्लेक्सोलॉजी शियात्सु असे विविध मसाज येथे आहेत. तसेच चेहरा, केसांचे आणि नखांचे सौन्दर्य वाढविण्यासाठीची मसाज आणि सौन्दर्य प्रसाधने येथे उपलब्ध आहेत.
बॉडी मसाज किंवा बॉडी स्पाबाबत लोकांच्या वेगवेगळ्या धारणा असतात. अनेक वेळा मसाजमध्ये काय होते हे माहीत नसल्यामुळे लोक जात नाहीत. पण बॉडी मसाज आणि स्पा तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. जर खूप तणाव असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की शरीरात कुठेतरी वेदना होत असेल तर बॉडी मसाज करणे खूप फायदेशीर ठरू शकते. स्पा उपचाराने शरीराच्या ऊतींमध्ये देखील फरक पडू शकतो आणि यामुळे तुम्हाला आराम मिळेल. स्पा सोबत, तुम्ही स्टीम बाथ, थर्मल स्पा इत्यादी घेऊ शकता. तसेच मसाजमुळे शरीर आणि मनाचा समतोल साधता येतो. यामध्ये तुमचे स्नायू, मऊ उती आणि अस्थिबंधन शिथिल होतात. मसाजमुळे संपूर्ण शरीर विश्रांतीच्या स्थितीत पोहोचते. यामुळे शरीरातील सर्व थकवा दूर होतो आणि व्यक्ती फ्रेश वाटू लागते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!