38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

आशाजींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्यच : शान

Date:

Share post:

पिंपरी : जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मला मिळेल असे कधीही वाटले नव्हते, सर्व सन्मान एकीकडे आणि हा पुरस्कार एकीकडे एवढे या पुरस्काराचे माझ्यासाठी महत्व आहे. अशी भावना प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार शान उर्फ शांतनू मुखर्जी यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, सिध्दीविनायक ग्रुप पुरस्कृत २०वा ‘आशा भोसले पुरस्कार २०२४’ प्रसिद्ध पार्श्वगायक शान ( शांतनू मुखर्जी) यांना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला. एक लाख अकरा हजार रुपये, शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी भाऊसाहेब भोईर (अध्यक्ष,अ. भा. मराठी नाट्य परिषद पि. चिं शाखा), कृष्णकुमार गोयल (उपाध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद पि. चिं शाखा) तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित उपस्थित होते.

शान म्हणाले, माझ्या वयाच्या १४व्या वर्षी वडील गेले मात्र माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळेच मी आज तुमच्यापुढे उभा आहे,

पं.हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की, शान आणि माझी ओळख नव्हती, त्यांची गाणीही मी फारशी ऐकलेली नाहीत पण त्यांचे वडील मानस मुखर्जी आमचे जवळचे मित्र होते. लता आणि आशा भोसले त्यांच्या चाहत्या होत्या. मानस यांनी खूप कष्ट घेतले पण त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. त्यांच्याच कष्टाची पुण्याई आज शान यांच्या कामी आली आहे. ज्या प्रमाणे आमच्या वडिलांची पुण्याई आम्हा भावंडाच्या उपयोगी आली तशीच शान यांच्याबाबतीतही घडले.

प्रास्ताविकात भाऊसाहेब भोईर म्हणाले की, भारताची नव्हे तर जगाची शान असणारे पार्श्वगायक शान यांना हा पुरस्कार प्रदान केल्यामुळे आता पिंपरी चिंचवड शहराची शान आणखी वाढली आहे. मला नेहमी प्रश्न पडायचा मोठी माणसं मोठी का होतात? कारण ही माणसं आधी माणूस म्हणून मोठी असतात. जमीनीवर असतात. शान यांचाही साधेपणाही मला भावला, यामुळेच ही माणंस जगविख्यात होतात. मी शान यांना शब्द दिला होता की कार्यक्रमाला कितीही उशीर झाला तरी आपला कार्यक्रम हा होणार कारण, तुम्ही सरस्वतीचे तर मी नटराजाचा भक्त आहे. ही भूमी मोरया गोसावींची आहे. याच भूमीत आपण शंभर वर्षात झालं नाही असं दिमाखदार शंभरावे नाट्यसमेंलन पार पाडलं. पं. हृदयनाथ मंगेशकरांनी तर मला आपल्या कुटुंबात स्थान दिलंय. कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी जेव्हा त्यांच्या मी घरी गेलो. त्यांची अवस्था पाहून मला भरुन आलं, पण अशाही अवस्थेत ते मला म्हटले मी कार्यक्रमाला येणार आणि ते आले. लोकांना मनोरंजन करण्यासाठी सरस्वतीने पाठवलेली ही अद्भुत व्यक्तिमत्वं आहेत. मंगेशकर कुटुंबीय मला त्यांच्यातील एक सदस्य समजतात ह्या पेक्षा माझी श्रीमंती कोणती असू शकते. ही माझी श्रीमंती म्हणजे माझ्या शहराची श्रीमंती आहे. आशाताईंची नव्वदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांची 89वी ही आपण इथेच साजरी करणार आहोत.

शान यांनी घसा बसला असला तरी ‘जब से तेरे नैना’, ‘चांद सिफारिश जो करता हमारी’ आणि इतर गाणी गायली त्याला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शान यांनी आशा भोसले यांच्या आवाजातील मोबाईल रेकार्ड ऐकवताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.

या प्रसंगी शान आणि आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित संगीतरजनी कार्यक्रम सादर करण्यात आला. रसिकांकडूनही खूप प्रतिसाद मिळाला. तसेच अयोध्येत राममंदिर लोकार्पण प्रसंगी आपल्या सनई चौघडा वादनाने रामभक्त तसेच देशवासियांना मंत्रमुग्ध करणारे रमेश पाचंगे यांच्याही पार्श्वगायक शान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार कृष्णकुमार गोयल यांनी मानले तर सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.

चौकट- ” पं. हृदनाथ मंगेशकर म्हणाले की, भाऊसाहेब भोईर आणि मी गेली २० वर्षे एकत्र आहोत. माझ्या उपस्थितीत २५ वर्षे हा कार्यक्रम व्हावा अशी इच्छा आहे. तुम्हाला आमदार झालेले मला पाहायचे आहे, आपल्या शहरासाठी, लोकांसाठी सामाजिक बांधिलकी कशी जपावी याचे प्रतिबिंब भाऊसाहेब भोईर आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!