38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

‘चॅम्पियनशिप  कॅट शो’चे 5 नोव्हेंबर रोजी आयोजन

Date:

Share post:

पुणे : द फेलाईन क्लब ऑफ इंडिया, या संस्थेच्या वतीने येत्या 5 नोव्हेंबर रोजी पुण्यात एका आगळ्या वेगळ्या ‘चॅम्पियनशिप  कॅट शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या कॅट शो मध्ये पुणेकरांना विविध देशांतील प्रजातींच्या मांजरी बघायला मिळणार आहेत. तसेच मांजर प्रेमींसाठी विविध प्रकारची माहिती एका छताखाली मिळणार आहे, अशी माहिती द फेलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकीब पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला बिकास मोहंती ( मार्केटिंग मॅनेजर,  ऑरेंज पेट न्यूट्रीशीएन) ,  डॉ. सलोनी जोशी (मांजर तज्ञ, पॉसम व्हेट क्लिनिक) आदि उपस्थित होते. 

पुढे बोलताना साकीब पठाण म्हणाले, द फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने भारतात विविध शहरात ‘चॅम्पियनशिप  कॅट शो’चे आयोजन करण्यात येते. पुण्यातील शो रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी तुलसी व्हीला लोणकर आळी, मगरपट्टा, मुंढवा येथे सकाळी 10 वा.  ते सायंकाळी 7 वा. या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 300 हून अधिक कॅट्स सहभागी होतील असा अंदाज आहे. या शो मध्ये दिवसभर विविध उपक्रम होणार आहेत. ग्रूमिंग, अडोपटेशन, रजिस्ट्रेशन या संबंधी माहिती दिली जाणार आहे, तसेच याठिकाणी कॅट फूड आणि अन्य साहित्याच्या स्टॉल्स देखील असणार आहेत.

या ‘चॅम्पियनशिप  कॅट शो’ मध्ये विजेत्या कॅट ची निवड ही आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवण्यात आलेल्या निकषाप्रमाणे करण्यात येते, ज्यानुसार कॅट  ज्या  प्रजातीची आहे त्यानुसार तिचे योग्य वजन, वाढ, आरोग्य आहे किंवा नाही यावरून करण्यात येते. यामुळे तुमच्या मांजरीला काय येते? यापेक्षा तुम्ही तिची योग्य निगा राखताय की नाही ? हे पहाणे गरजेचे असणार आहे. या ‘चॅम्पियनशिप  कॅट शो’चे परीक्षण मायकेल वुड्स (ऑस्ट्रेलिया) फॅडली फौद  (इंडोनेशिया) हे करणार आहेत, असेही पठाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!