38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

सामाजिक उपक्रमांसाठी ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ चे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजन

Date:

Share post:

पुणे : कशिश प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘MR, MISS, MRS. GLOBAL MAHARASHTRA’ आणि लहान मुलांसाठी ‘RISING STAR’ या फॅशन शोचे आयोजन येत्या ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या शो मधून जमा होणारा निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. या फॅशन शो च्या माध्यमातून  दुर्गम भागातील महिलांना सॅनेटरी  नॅप्किन्स चे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती कशिश प्रॉडक्शन्सचे अध्यक्ष आणि पुण्याचे ‘पॅड मॅन’  योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ झालेल्या या पत्रकार परिषदेला पुण्याचे ‘पॅड मॅन’  योगेश पवार, दीपाली कांबळे, अर्चना माघाडे, रूपा पवळे, पीया कोसुंबकर आदि उपस्थित होते. 

फॅशन शो बद्दल योगेश पवार म्हणाले, आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयीचे विविध उपक्रम राबावत असतो. ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यभरातून आलेल्या नोंदणी मधून  स्पर्धेसाठी निवड केली आहे. सौंदर्य स्पर्धा म्हटंले की सहभागांसाठी अनेक निकष लावले जातात. पण या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वय, वजन, ऊंची याचे कोणतेही निकष लावण्यात आलेले नाही. ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली असणार आहे. या Mr, Miss,Mrs. स्पर्धेसाठी कोणतीही वयोमार्यादा ठेवण्यात आलेली नाही. तसेच RISING STAR या स्पर्धेत लहान मुलांचा सहभाग आहे. 

‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’  साठी परीक्षक म्हणून काशीश फॅशन स्टुडिओ ब्रँड ॲ्बेसेडर वैशाली भारद्वाज, अभिनेता प्रसाद खैरे, अभिनेत्री पूजा वाघ, प्रियांका मिसळ, अल्विरा मोशन च्या दीपाली कांबळे काम पाहणार आहेत. हा फॅशन शो  येत्या ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे दुपारी १ वाजता होणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!