38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न 

Date:

Share post:

पुणे: आयोध्येत श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त  साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. ‘ॲड. यशवंत जमादार’ असे या मराठी चित्रपटाचे नाव असून एस.के. प्रॉडक्शन च्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटांचे निर्माते संजय अग्रवाल असून दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी सांभाळत आहेत. 

‘ॲड. यशवंत जमादार’  चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी रमेशचंद्र अग्रवाल यांनी लाल रिबीन कापून उद्घाटन केले, सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर यांनी दीप प्रज्वलन  तर संजीव अग्रवाल यांनी श्री गणपती आणि श्री राम भगवान यांची पूजा केली तसेच दर्शन ठक्कर यांनी नारळ फोडून पूजा संपन्न केली.यावेळी लेखक संजय नवगिरे, डिओपी आणि संकलक सिद्धेश मोरे, संगीतकार अजित परब, प्रोजेक्ट हेड अमर लष्कर,गीतकार मंदार चोळकर ,अभिनेते मकरंद देशपांडे उपस्थित होते. ‘ॲड. यशवंत जमादार’ या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे, ऋषिकेश जोशी, भारत गणेशपुरे, कैलास वाघमारे, अभिनेत्री सायली संजीव, विशाखा सुभेदार, प्रतीक्षा जाधव, शिवाली परब, अनुष्का पिंपुटकर, प्राजक्ता हनमघर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

या प्रसंगी बोलताना चंद्रकांत ठक्कर म्हणाले, ‘ॲड. यशवंत जमादार’ या मराठी चित्रपटात आज समाजात अत्यंत संवेदनशील असलेला विषय आम्ही हाताळला आहे. लग्न संस्था ही आपल्या भारतीय रूढी परंपरेमधील अत्यंत महत्वाचा विषय आहे. मात्र अलीकडे बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनशैलीचा परिणाम या संस्थेवर होताना दिसतोय. त्याच संबंधीचा विषय अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.  समाजाला एका संवेदनशील विषयाची जाणीव करून देण्याचे काम आम्ही ‘ॲड.यशवंत जमादार’  च्या माध्यमातून करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!