38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

काँग्रेस नेते मोहन जोशींनी घेतली तब्बल ४०० गणपती मंडळांची भेट

Date:

Share post:


पुणे : देशभरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून झाली असल्याने पुण्यातील गणेशोत्सवाला वेगळे महत्त्व असते. देशभरातून नागरिक पुण्याचे गणपती पाहायला येतात. यंदाही लाखो गणेशभक्तांनी पुण्यातील बाप्पांचे दर्शन घेत, देखावे पाहण्यासाठी गर्दी केली.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळीनी मानाच्या गणपतींना भेटी दिल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील, कृष्णा साठे, चेतन आग्रवाल, आयुब पठाण, महेंद्र चव्हाण, सुरेश कांबळे, ज्ञानेश्वर जाधव, अक्षय थोरात या सहकारी व कार्यकर्त्यांसमवेत पुण्यातील मानाच्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा या गणपतींसह तब्बल ४०० गणपती मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

पुणे शहराच्या विविध भागातील गणपती मंडळांना माजी आमदार व ज्येष्ठ नेते मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर व कार्यकर्त्यांसोबत भेटी दिल्या. गणेशोत्सवात पाऊस देखील बऱ्यापैकी झाला. त्यामुळे कधी चालत, दुचाकीवरून तर कधी रिक्षाने फिरून गणपती मंडळांना भेटी दिल्या व गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. राज्यावर असणारे कोरड्या दुष्काळाचे संकट दूर व्हावे व बळीराजाला दिलासा मिळावा असे साकडे गणपती बाप्पाच्या चरणी घातले आहे, असे रोहन सुरवसे-पाटील म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!