38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

परीक्षक विशाल ददलानी म्हणतो, “वंदे मातरम’ या ‘फाइटर’च्या अँथमसाठी इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांना आपला आवाज देताना पाहून ऊर अभिमानाने भरून आला”

Date:

Share post:

एक अभूतपूर्व सहयोग होऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या प्रतिष्ठित गायन रियालिटी शोच्या स्पर्धकांना ‘फाइटर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील ‘वंदे मातरम’ (फाइटर अँथम) या गीतासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली. विशाल शेखर या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने हे गीत स्वरबद्ध केले आहे आणि वैभव गुप्ता (कानपूर), शुभदीप दास चौधरी (कोलकाता), दीपन मित्रा (कोलकाता), ओबोम तांगू (तुतिंग), उत्कर्ष वानखेडे (नागपूर) आणि पियुष पनवर (बालोत्रा, राजस्थान) या स्पर्धकांना हे जोशपूर्ण देशभक्ती गीत गाण्याची संधी मिळाली आणि अशा प्रकारे हिंदी संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाचाही शुभारंभ झाला.

हे गीत आणि इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांविषयी बोलताना संगीतकार विशाल ददलानी म्हणाला, “वंदे मातरम’ या ‘फाइटर’च्या अँथमसाठी इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांना आपला आवाज देताना पाहून ऊर अभिमानाने भरून आला. या प्रतिभावान मुलांनी केवळ या मंचावर आपले गायन कौशल्य दाखवलेले नाही, तर ‘फाइटर’सारख्या मोठ्या चित्रपटाद्वारे पार्श्वगायन क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. आम्हाला (विशाल, शेखर) वाटते की, त्यांचे पॅशन, निष्ठा आणि टवटवीत प्रतिभा या संपूर्ण स्पर्धेत नजरेत भरणारी होती आणि आता त्यांचा आवाज अगदी तयार झाला आहे, जो मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असतो. ही संधी म्हणजे त्यांच्या कष्टाची पावती तर आहेच, शिवाय तो त्यांच्या सांगीतिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. याबद्दल हृतिक रोशन (ज्याची ही कल्पना होती) आणि सिद्धार्थ आनंद यांना मी धन्यवाद देतो, ज्यांनी या नवीन, उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन दिले. तर, अशा प्रकारे, आपल्या आगामी आयडॉल्सनी ‘फाइटर’ चित्रपटात ‘वंदे मातरम’ गाऊन या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे.”

या संधीविषयी बोलताना कानपूरचा वैभव गुप्ता म्हणाला, “विशाल-शेखर सरांकडून एवढी मोठी संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आमच्यावर विश्वास दाखवून त्यांनी आम्हाला ‘वंदे मातरम’ हे फाइटर अँथम सादर करण्याची संधी दिली. आम्ही जेव्हा हृतिक रोशन सरांच्या एंट्रीसाठी ‘सुजलाम सुफलाम’ परफॉर्म केले, तेव्हा याची सुरुवात झाली. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो आमच्या शोमध्ये आला होता. त्याला आमचा परफॉर्मन्स आवडला आणि त्याने विशाल सरांना विनंती केली की, त्यांनी आम्हाला या चित्रपटात परफॉर्म करण्याची संधी द्यावी. अशा प्रकारे विशाल-शेखर सरांसाठी गाऊन आमचे पदार्पण झाले. विशाल-शेखर सरांनी आम्हाला 2024 मधील हे प्रतीक्षित गाणे रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओमध्ये बोलावले. त्या व्यतिरिक्त मी इंडियन आयडॉल परिवार आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा देखील आभारी आहे कारण त्यांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला.”

राजस्थानच्या पियुष पनवरने पुस्ती जोडत म्हटले, आमच्यावर इतका विश्वास दाखवल्याबद्दल मी संगीतकार जोडी विशाल-शेखरचा खूप ऋणी आहे. आणि दुसरे म्हणजे हृतिक रोशन सरांचा खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला माझा लुक बदलण्यास खूप मदत केली. आणि या नवीन लुकमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे आणि लगेच मला एवढ्या मोठ्या चित्रपटातील गीतासाठी गाण्याची संधी देखील मिळाली. स्पर्धा सुरू असतानाच ही संधी आम्हाला मिळाल्यामुळे आमच्या मनात नवीन स्वप्ने जागी झाली आहेत आणि भविष्यात चमकण्याची नवी आशा पालवली आहे. या प्रतिष्ठित शो चा स्पर्धक असल्याचा मला अभिमान वाटतो आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या या परीक्षकांसमोर परफॉर्म करताना मला धन्यता वाटते.”

बघत रहा, इंडियन आयडॉल 14, दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!