38.4 C
Pune
Friday, May 3, 2024

मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मधल्या आपल्या आगामी गॅगविषयी बोलताना हेमांगी कवी म्हणते, “प्रेक्षकांना ‘देवदास’ची पारो नव्या रूपात बघायला मिळेल”

Date:

Share post:

या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शो मध्ये हास्य-विनोदात रंगून जाण्यासाठी तयार रहा, कारण टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबी, सुरभी चंदना आणि अदा खान यांच्या उपस्थितीत ‘डेली सोप क्वीन्स’ हा विशेष भाग साजरा होणार आहे.

विनोदवीर केतन सिंह, कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी मिळून ‘देवदास’ या क्लासिक चित्रपटाचे विडंबन सादर करणार आहेत. यामध्ये केतन देव बाबूच्या, कुशल चुन्नी बाबूच्या तर हेमांगी पारोच्या रूपात दिसेल. या स्पूफमध्ये देव बाबूचा ब्रेकअप झाल्यामुळे निराश झालेला चुन्नी बाबू दिसेल. या परिस्थितीत चुन्नी बाबू हा देव बाबूच्या दुःखाचा फायदा घेऊन दुकान बळकावण्याचा खटाटोप करताना दिसेल. पण देव बाबूची एक्स-गर्लफ्रेंड पारो मध्ये-मध्ये लुडबूड करत असल्याने गोंधळ निर्माण होतो. एकामागून एक अनेक विनोदी प्रसंग घडतात आणि अखेरीस चुन्नी बाबू आणि देव बाबू दोघेही आर्थिक अडचणीत सापडतात.

हा गॅग खूपच मनोरंजक असणार आहे. त्यात पारोची भूमिका करण्याचा अनुभव सांगताना हेमांगी कवी म्हणते, “मी संजय लीला भन्साळींची आणि ‘देवदास’मध्ये त्यांनी उभ्या केलेल्या ‘पारो’ या व्यक्तिरेखेची मोठी फॅन आहे. माझ्या कारकिर्दीत पारोची भूमिका करण्याची माझी पहिल्यापासून इच्छा होती. ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’च्या मदतीने माझी ती इच्छा पूर्ण होत आहे. लोकांना पारो या विलक्षण व्यक्तिरेखेचे एक नवीन विनोदी रूप बघायला मिळेल. कॉस्च्युम टीम विशेष अभिनंदनास पात्र आहे कारण पारोच्या पोशाखातून त्यांनी तिची व्यक्तिरेखा उत्तम टिपली आहे. आणि अर्थात कुशल बद्रिके आणि केतन सिंह या दोन अद्भुत कलाकारांसोबत काम करताना फारच मजा येते, कारण पडद्याच्या मागच्या आमच्या मैत्रीचे प्रतिबिंब पडद्यावरच्या आमच्या अभिनयातून दिसते. मला आशा आहे की, आम्हाला हा अॅक्ट करताना जितकी मजा आली, तितकीच मजा प्रेक्षकांना अॅक्ट बघताना देखील येईल!”

बघायला विसरू नका ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!