25.7 C
Pune
Friday, May 3, 2024

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये केतन सिंह म्हणतो, “ज्या दिवशी मी VHS टेपवर ‘मैने प्यार किया’ चित्रपट पाहिला तेव्हाच मी भाग्यश्रीचा मोठा फॅन झालो!”

Date:

Share post:

या शनिवारी, आपल्या सीटचे बेल्ट घट्ट बांधून घ्या, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो तुम्हाला घेऊन जाणार आहे लाफ्टर राईडवर! यावेळी ‘मॅडनेस की मालकीन’ हुमा कुरेशीसोबत असेल सदाबहार बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री! होस्ट हर्ष गुजरालने सादर केलेल्या धमाल स्टँडअप पासून ते तुम्हाला खदखदून हसवणाऱ्या अॅक्ट्सपर्यंत सारे काही या भागात असणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी तो आवर्जून बघितला पाहिजे!

या भागात कुशल बद्रिके आणि केतन सिंह एकत्र मिळून ‘मजदूर गॅग’ हे धमाल गॅग सादर करणार आहेत. यामध्ये ते रोजंदारी कामगारांचा संघर्ष दाखवतील. यातल्या कामगारांना आपल्या कामाच्या ठिकाणी एक छुपा खजिना सापडला आहे याचे हास्यपूर्ण चित्रण प्रेक्षकांना जबरदस्त कॉमिक अनुभव देऊन जाईल. यानंतर, गौरव दुबे, सिद्धार्थ सागर, हेमांगी कवी आणि इंदर साहनी ‘मैने प्यार किया’ चित्रपटावर आधारित एक अॅक्ट सादर करतील. या अॅक्टमधून भारतीय कुटुंबांमधल्या गंमती-जमती ते दाखवतील आणि प्रेक्षकांना खूप हसवतील. अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या अॅक्ट्सने भरलेला हा शो भरपूर मनोरंजन, हास्याची कारंजी आणि चिरस्मरणीय क्षणांची हमी देतो.

भाग्यश्रीचा फॅन असलेला केतन सिंह तिच्या समक्ष परफॉर्म करण्याचा आपला अनुभव सांगताना म्हणाला, “ज्या दिवशी मी भाग्यश्रीचा चित्रपट ‘मैने प्यार किया’ VHS टेपवर बघितला, तेव्हाची मी तिचा मोठा चाहता झालो. अजूनही प्रत्येक वेळी मी हा चित्रपट पाहतो तेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा पाहिल्याचा अनुभव जागा होतो. या चित्रपटातील तिचा स्क्रीन प्रेझेन्स अफलातून होता. ती आमच्या शो मध्ये येणे आणि तिच्यासमोर आम्ही परफॉर्म करणे हे दोन्ही अनुभव अप्रतिम होते. शिवाय, ती खूपच मनमोकळी आहे आमच्या अॅक्टमध्ये ती रंगून गेली होती त्यामुळे तिच्या उपस्थितीमुळे आम्ही अवघडलो नाही.”

बघायला विसरू नका, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या शनिवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!