38.6 C
Pune
Saturday, May 4, 2024

मधुराणी गोखले आणि विवेक सांगळे यांनी ‘बिग बेस्ट कॅरेक्टर’ ची ट्रॉफी जिंकली

Date:

Share post:


पुणे : मराठी टेलिव्हिजन उद्योगातील सर्वोत्कृष्ट उत्सव साजरा करत, बिग एफ.एम ने बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्सच्या दुसऱ्या पर्वाचे भव्य पद्धतीने आयोजन केले. यामध्ये लोकप्रिय कलाकार विवेक सांगळे आणि मधुराणी गोखले यांनी अनुक्रमे बिग सर्वोत्कृष्ट पात्र पुरुष आणि स्त्री (बेस्ट कॅरेक्टर मेल आणि फिमेल) चा पुरस्कार पटकावला. कलाकार ओंकार गोवर्धन आणि निवेदिता सराफ यांनी बिग सहाय्यक पात्र (पुरुष आणि स्त्री) ची (सपोर्टिंग कॅरेक्टर मेल आणि फिमेलची) ट्रॉफी जिंकली. आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मुग्ध करत योगयोगेश्वर जय शंकर नी बिग (सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत) बेस्ट टायटल साँग जिंकले. बिग सर्वोत्कृष्ट कुटुंब (बेस्ट फॅमिली) गटात अनेक जणांचे मन जिंकणारी कुलकर्णी फॅमिली जिंकली. ऋषिकेश शेलार आणि माधवी कुलकर्णी यांना बिग सर्वोत्कृष्ट खलनायक चा (बेस्ट व्हिलनचा) पुरस्कार मिळाला. बिग सर्वोत्कृष्ट (बेस्ट) जोडीच्या गटात चेतन वडनेरे आणि ज्ञानदा रामतिर्थकर यांनी आपल्या शानदार ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने बाजी मारली. महाराष्ट्राची हास्यजत्राला बिग सर्वोत्कृष्ट (बेस्ट) नॉन-फिक्शन शोच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट अभिनय करत अभिनेते प्रशांत दामले यांना ‘नाटक विशेष पुरस्कार (ड्रामा स्पेशल अवॉर्ड)’ मिळाला. बहुगुणी, अवधूत गुप्ते यांना ‘बिग वर्षाचा सर्वात प्रतिभावान कलाकार (मोस्ट टॅलेंटेड आर्टिस्ट ऑफ द इयर)’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अष्टपैलू भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिद्धार्थ जाधवला ‘बिग दमदार अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार (पॉवरफुल व्हर्सटाइल अॅक्टर ऑफ द इयर)’ हा पुरस्कार मिळाला आणि आपल्या कसदार भूमिकांनी प्रेक्षकांचे मन आकर्षित करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ‘बिग वर्षाचा प्रभावी कलाकार (इम्पॅक्टफुल परफॉर्मर ऑफ द इयर)’ हा किताब पटकावला.
या पुरस्कारांविषयी बोलताना बिग एफ.एम चे सी.ओ.ओ सुनील कुमारन म्हणाले की, “यावर्षी प्रथमच बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्सचे वास्तविकरित्या (ऑन-ग्राउंड) आयोजन करताना आम्ही खूप खुश आहोत. या अविश्वसनीय प्रतिभेनी त्यांच्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि म्हणूनच त्यांचा व्यक्तिशः सत्कार करताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे. त्यांच्या आवडत्या कलाकारांना मत देणाऱ्या श्रोत्यांकडून आम्हाला मिळालेला सहभाग नेत्रदीपक आहे आणि व्यासपीठ मिळवू शकलेल्या सहभागाचा खरा पुरावा म्हणून उभा आहे. आम्ही विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि अनेक काळासाठी (वर्षे) त्यांना भेटत राहण्याची आशा करतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे

या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका रामनवमीच्या मंगल पर्वाला करणार भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

17 एप्रिल रोजी 1 तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक निष्ठा आणि मैत्रीच्या चिरस्थायी नात्याचे साक्षीदार होतील राम नवमीच्या शुभ प्रसंगी,...

अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

नवी दिल्ली : अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री.स्वानंद देव यांची...

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: कोरोना महामारी आली अन् आख्या जगाला हलवून गेली. या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र...
error: Content is protected !!